Posts

Showing posts from 2018

nisargotsav

आम्ही इथे आल्यापासून एक निराळच  जग उलगडतय माझ्यासमोर …. खूप मोठमोठाले उंच वृक्ष आणि हिरवे वस्त्र पांघरून असलेले अशोक, पिंपळ,कडूनिंब … आणि कितीतरी डेरेदार वैभवशाली झाडं आपला हरितोत्सव साजरा करीत असतात ऋतू येतात आणि जातात …।ऋतूंच्या आगमनासोबत ते नवीन तेज ,नवी झळाळी धारण करतात .. नवीन ऋतूच स्वागत किती आणि कसं करू असं होतं त्यांना………… त्यांच्या उत्सवी उत्साहाला तर सीमाच नाही....  . वाऱ्याच्या स्पर्शाने ती भावसमाधीत मग्न झाल्यासारखी डोलू लागतात त्यांचे हिरवे टोकं झोके घेऊन आकाशालाही झुलवायला निघतात तेव्हा सामान्यांच्या दुर्दम्य महात्वाकांक्षाचीच  आठवण होते . हे वृक्ष मला मानवतेचे पुजारीच वाटतात , कारण अशा अदम्य प्रेमभावनेशिवाय काय असं डोलता येइल ?हसता येईल ? सृष्टीत स्वतःला विसर्जित करण्याची त्यांची शक्ती अदभूत आहे .त्यांचं वेगळं असं अस्तित्व नाहीच ..... हिरवेपण धारण केलेलं ते पार्श्वभूमीला माथी धरून ...आभाळ पांघरायचं ते सोबतच्या चराचराचे अस्तित्व स्विकारून .... त्यांच्या रंगगंधांचं जितकं कोडकौतूक करावं तेवढं कमीच ....... हिरवेपणाचे रंग तरी किती वेगळे .पण विसंगती नाही ....