Posts

Showing posts from 2011

charoli by aparna

ओठातले  गाणे ओठातच ठेवायचे  ही काही रीत नसते, प्यायचे विषही असेल  तर  मरायचीही बंदी असते , उगीच खुळेपण करू नये ,  बघ आकाश निळेच असते.  रस जीवनात घेवून  बघ,  .जगण्याची धुंदी वेगळीच असते

kavita by aparna

 माझ्या              स्वप्नातली       पाखरं    तुझ्या    दारात     भिरभिरत  नि  चिवचिवत  आली  , तेव्हाच  तुला  समजलं ना   कि  पहाट  झाली  आहे  म्हणून  ? तेव्हापासून  तू  सारखा    pahatagani   गातो  आहेस ............. नी मी  इथे  अंधारात  ............ घरट्यात नि:स्वप्न......   ...नि :शब्द .. ......... ....pahatnarya   निलाईचे .....  आकाश  पांघरून ............ स्वप्नातल्या  पाखरांच्या   परतण्याची  वाट  पाहत .................

charoli by Aparna

दुखः येतंसोबत घेऊन आसू  सुख येतं सोबत घेऊन हसू  दोघांचीही कूस शेवटी एकच असते , म्हणूनच ती एक पाठशिवणी असते .
भरून घ्यावा हृदयात श्वास . उगीच सोडायचे नाहीत निश्वास  जगणं हाती आलंच तर .....उरत नाही मग नुसतेच भास , आभासांना मन असतं.. केवळ एक सावली नसते , नि सावलीच्याही मागे एक प्रकाशाचे झाड असते . j
सिंधुताई म्हणजे   करुणेचा सागर आईपणाचा अखंड जागर  , मातृहृदयाची  चीरवेदना आईच्या हृदयाची ...........       .  ....                 आतून उमलून येणारी चेतना                      सिंधुताई  म्हणजे  सीतेच्या वाट्याला           आलेलं    प्राक्तन , चीन्धीच्या रूपाने जगलेलं वास्तव   अंगभर चिंध्या     लेऊनही फुलणारं वैभव  राजप्रसादालाही   लाजवेल , असं  भावना - संवेदनाच गाव  सिंधुताई  म्हणजे      शेवटी   साफल्याचा   समुद्र , कवितेच्या   सागरातून वेचलेले ,          शिंपले   मोती          रत्न     धन त्या समुद्राच्या आत्म-मंथनातून   सापडलेल्या  अमृतातून   अमृतमय   ...

charoli by aparna -

मी कवितेच्या गावी गेले ,  जाताच तीन प्रसन्न स्वागत केलं,  हसली नि माझ्या पदरात ओंजळभर  बकुळीची फुलं टाकली, तेव्हापासून माझी कविता हसते आहे , बहरते आहे .................................

marathi charolya by aparna -

वाऱ्यासोबत  झुलत जावं, लहरींसोबत गात जावं, पक्षांसोबत बोलत जावं, झर्यासोबत हसत जावं , अंधारात हरवत जावं , काजव्यासोबत चमकत जावं , आयुष्यासोबत धावत जावं , ह्याला जीवन ऐसे नाव !

Sindhutai Sapkal hyanchya jeevanavar- by Aparna

जलधारांच्या वर्षावाने माया ओथांबुनी आली ........त्या सिंधुताई  तेजाच्या तेजात न्हाउनी मानवता प्रकाशित झाली .........त्या सिंधुताई वाऱ्याचा संघर्ष होऊनी कष्टाचे डोंगर उपसले ..........त्या सिंधुताई  पृथ्वीच्या मृदगंधाने माता करुणामयी झाली .............त्या सिंधुताई  आकाशाच्या अथांग निळाईने उघडे बाळ जगविले............त्या सिंधुताई  पंचभूतांच्या आरतीनेही तेज  गायिले जाणार नाही ...........त्या सिंधुताई  श्वासांचे अंतर जगणे नाही, हसणे -रडणे जगणे नाही .......हे सांगते माई स्वप्न पहावी पंखात भरुनी बळ, मागे पाहणे नाही ........हे सांगते माई  चालत जाणे  कष्टवित पाय, आईचे काळीज होऊनी पाही ..........हेच सांगते माई

Ayushya Kay Ahe? Thoughts by Aparna

आयुष्य  काय आहे?   वाटेवरचं वळण ?सरळसोट वाट की katyakutyani रक्ताळलेली paoolwat? डोंगरावरची कठीण चढाई की डोंगर उतारावरची हरखणारी पायवाट? कलकल वाहणाऱ्या  नद्यांची खळखळ की निळाई पांघरून बसलेल्या डोहाची शांत नीरवता? हसणाऱ्या पक्षांची चिवचिव  की घनगंभीर मेघगर्जना ? योग्यांच रूप ध्यानस्थ की कलाकाराला पडलेलं  सर्जनाच स्वप्न?काय असेल ते खरंपण शेवटी आपल्या अनुभूतीचाच विषय आहे तो . नाही का ?

marathi charolya by aparna

अमृत  मागून घेता घेता , अमृतच झाले जीवन. कुरुपतेच्या पंखाखाली,  निजला तान्हा ,हसले जीवन !

marathi charolya

सांजवात लाव म्हणालास ,  म्हणून दिवा लावायला गेले, आयुष्यभर तेलं आणि वातहोऊन जळत राहिले , तरी तू म्हणतोस की  ,  उजेड कसा  तो  पडलाच नाही ?................  

Marathi kavita

सूर्याचा अस्त  सूर्याचा अस्त होताच . काळोख   चाचरत   पुढे  आला ..                 म्हणाला,  गेला    का    तो     ?         जाणारच  तो  .......  माझ्यापुढे   काय  चालणार  त्याचे ? माझ्या सोबतीला   आहेत   चंद्र   आणि  तारे  ,  लुकलुकणारा  शुक्र   , .लालभडक  मंगळ. आणि  कितीतरी ,  तो   तर.......... एकटाच    ... एकाकी        .  रात्र    होताच   टिकतच   नाही  त्याचं   अस्तित्व   ........  सृष्टी      हसली............      मनातल्या मनातच , आणि उद्याच्या सूर्योदयाची  वाट  पाहत   पाहत, मानवजातीला अंगाई गीत गाऊ लागली ......................      .....