Marathi kavita

सूर्याचा अस्त

 सूर्याचा अस्त होताच .
काळोख   चाचरत   पुढे  आला ..               
 म्हणाला,  गेला    का    तो     ?       
 जाणारच  तो  .......
 माझ्यापुढे   काय  चालणार  त्याचे ?
माझ्या सोबतीला   आहेत   चंद्र   आणि  तारे  ,
 लुकलुकणारा  शुक्र   , .लालभडक  मंगळ. आणि  कितीतरी ,
 तो   तर.......... एकटाच    ... एकाकी        .
 रात्र    होताच   टिकतच   नाही  त्याचं   अस्तित्व   ........
 सृष्टी      हसली............      मनातल्या मनातच ,
आणि उद्याच्या सूर्योदयाची  वाट  पाहत   पाहत,
मानवजातीला अंगाई गीत गाऊ लागली ......................


     .....

 

Comments

Popular posts from this blog

पायवाट