सिंधुताई म्हणजे करुणेचा सागर
आईपणाचा अखंड जागर
,
मातृहृदयाची चीरवेदना
आईच्या हृदयाची ........... . .... आतून उमलून येणारी चेतना
सिंधुताई म्हणजे सीतेच्या वाट्याला
आलेलं प्राक्तन ,
चीन्धीच्या रूपाने जगलेलं वास्तव
अंगभर चिंध्या लेऊनही फुलणारं वैभव
राजप्रसादालाही लाजवेल ,
असं भावना - संवेदनाच गाव
सिंधुताई म्हणजे शेवटी साफल्याचा समुद्र ,
कवितेच्या सागरातून वेचलेले ,
शिंपले मोती रत्न धन
त्या समुद्राच्या आत्म-मंथनातून सापडलेल्या
अमृतातून अमृतमय झालेलं जीवन
Comments
Post a Comment