ओथंबून आलेलं आकाश , तुझ्या डोळ्यात उतरलं .. तशा माझ्या मनाच्या अंगणात सरीवर सरी कोसळू लागल्या …. हिरव्या संवेदनाच रान , ,गाऊ लागलं ,फुलू लागलं सृजनाच्या स्वप्नांमध्ये , डोलू लागलं ,नाचू लागलं …। अफाट वारं उन्मळून , गर्जू लागलं उधळू लागलं ,तडिताघात सोसता -सोसता , वृक्षासारख उन्मळू लागलं आभाळ आता नितळ ल आहे , निवळून तूझ्या दिठी विसावल आहे ……… आणि आत आत माझ्या ते …. परत झाकोळून आलं आहे .............
Posts
Showing posts from March, 2015