ओथंबून आलेलं आकाश ,
तुझ्या डोळ्यात उतरलं ..
तशा माझ्या मनाच्या अंगणात
सरीवर सरी कोसळू लागल्या ….
हिरव्या संवेदनाच रान ,
,गाऊ लागलं ,फुलू लागलं
सृजनाच्या स्वप्नांमध्ये ,
डोलू लागलं ,नाचू लागलं …।
अफाट वारं उन्मळून ,
गर्जू लागलं उधळू लागलं
,तडिताघात सोसता -सोसता ,
वृक्षासारख उन्मळू लागलं
आभाळ आता नितळ ल आहे ,
निवळून तूझ्या दिठी विसावल आहे ………
आणि आत आत माझ्या ते ….
परत झाकोळून आलं आहे .............
तुझ्या डोळ्यात उतरलं ..
तशा माझ्या मनाच्या अंगणात
सरीवर सरी कोसळू लागल्या ….
हिरव्या संवेदनाच रान ,
,गाऊ लागलं ,फुलू लागलं
सृजनाच्या स्वप्नांमध्ये ,
डोलू लागलं ,नाचू लागलं …।
अफाट वारं उन्मळून ,
गर्जू लागलं उधळू लागलं
,तडिताघात सोसता -सोसता ,
वृक्षासारख उन्मळू लागलं
आभाळ आता नितळ ल आहे ,
निवळून तूझ्या दिठी विसावल आहे ………
आणि आत आत माझ्या ते ….
परत झाकोळून आलं आहे .............
Comments
Post a Comment