Posts

Showing posts from 2015
 काळे मेघ पांघरून सुस्तावलेले आकाश , कुठल्या उदासीनतेने टाकलेला पाश …  मळभणारया स्मृतींचा हा कोंडलेला श्वास , निळाईच्या प्रेमातला धरतीचा निश्वास ………  कळत -नकळत येणारा अश्रूंचा पूर , यमुनेच्या सावळ्या देहावरचा हा विदेही सूर  कणाकणाला होणारा हा कृष्णस्पर्श ….  चराचरला लाभणारा चैतन्यस्पर्श 
 श्रावणाच्या सरिसारखा ओथंबून टाकणारा तुझा सहवास ..... सावळ्या मेघांच्या गर्जनेसारखा उन्मळून टाकणारा तुझा श्वास …। प्राणात उचंबळून येणारे निळे गर्द मेघ पिवळ्या सोनसळी उन्हांसारखा नि हिरव्या तृणांचा मखमली स्पर्श नि हिरव्या तृणांकुरासारखा सर्जनोत्सुक हर्ष ……… आत आत कुठे रे साकळते ते घननीळ आकाश प्राणात माझ्या दाटून येतो निळा  -निळा  कृष्ण श्वास …. उघड आता तुझ्या चैतन्याची दारं …। भरून    घेऊ दे मला श्वासात श्रावणी वारं 
या वयातही  आठवणींना  बहर येतो ,खरे आहे , वठलेल्या झाडांनाही पालवी फुटते खरे आहे , म्हाताऱ्या क्षितिजावरही रोज तांबडं फुटतं खरं आहे, सायंकाळच्या सुर्यालाही पहाटेची स्वप्न पडतात खरं आहे ओढ्या-नदी झर्यामधून पाणी वाहतेच आहे ,खरं आहे ग्रीष्माच्या रणरणत्या उन्हातही माणसाची तहान भागतेहेही खरं  आहे सनातन चंद्रातूनही  शीतल  चांदणं पाझरत आहे ,हेही खरच आहे  रोज उगवणारा सूर्यही नवा-नवाच वाटतो आहे …. हे सगळं खरं आहे तर माणूसच का रडतो आहे ? आपल्याच खोट्या दुखांनी उगीच विव्हळत आहे…… तुटले पंख तरी नवी भरारी मारायची असते …… पराभूत झालात तरी कात नवीन टाकायची असते ……। मग रोज सूर्य नवा होतो पहाट हसरी होते …….  .   गोळाबेरीज शून्यं असली तरी जगणे सार्थक होते 
ओथंबून आलेलं आकाश , तुझ्या डोळ्यात उतरलं .. तशा माझ्या मनाच्या  अंगणात सरीवर सरी कोसळू लागल्या …. हिरव्या संवेदनाच रान ,  ,गाऊ लागलं ,फुलू लागलं सृजनाच्या स्वप्नांमध्ये ,  डोलू लागलं ,नाचू लागलं …। अफाट वारं उन्मळून , गर्जू लागलं उधळू लागलं   ,तडिताघात सोसता -सोसता , वृक्षासारख  उन्मळू लागलं आभाळ आता नितळ ल  आहे , निवळून तूझ्या दिठी विसावल आहे ……… आणि आत आत माझ्या ते …. परत झाकोळून आलं आहे ............. 
स्वप्न आपल्या डोळ्यात असली , तरी ती पहायची असतात .  मजल दरमजल करत ती ,  साकार करायची असतात .  प्रदेश आपला असतो , माणसंही आपलीच असतात ….  पण उधळणाऱ्या घोड्यासारखे , स्वप्नांचे खूर परके असतात …  म्हणून जपायचे असते  ,स्वप्नांचेही आपलेपण  … नाहीतर स्वप्न सार्थक होऊन सुद्धा , स्वतःशीच यायचे परकेपण …….    
tujha  shabdanchya prtikshet, ek yug ultun gele . tu mhantos mi tar maun prmsadhanet magna hoto......