काळे मेघ पांघरून सुस्तावलेले आकाश ,
कुठल्या उदासीनतेने टाकलेला पाश … 
मळभणारया स्मृतींचा हा कोंडलेला श्वास ,
निळाईच्या प्रेमातला धरतीचा निश्वास ……… 
कळत -नकळत येणारा अश्रूंचा पूर ,
यमुनेच्या सावळ्या देहावरचा हा विदेही सूर 
कणाकणाला होणारा हा कृष्णस्पर्श …. 
चराचरला लाभणारा चैतन्यस्पर्श 

Comments

Popular posts from this blog

पायवाट