सांज बावरे
सांज बावरे ...कातरवेळ अंधार उजेड पाठशिवणी खेळ रंग उतरे ..स्वप्नखेळ... आत आत...उरी घालमेल.... मन मन ...भारले क्षण.. तन तन ...रेशिम कण.... सय सय धावरी गाय.. आठवणींवर नवी साय..... बागड बागड मनाचा पक्षी.. काढ काढ नवनवी नक्षी.. नाच नाच अंगणी धारा फुलव फुलव प्रेमपिसारा... उगव उगव नवा चंद्र झुरव झुरव ..मनाचा इंद्र.. भार भार ..माथ्यावर घाव.. पार पार ..रोज नवा गाव.... धाव धाव वेडा ध्यास.. थांब थांब हा स्वप्न भास... जग जग श्वासप्रश्वास.... नको नको तो उपहास... उघड उघड शिळा उघड.. जगणं शोध सुघड सुघड... बेरीज बेरीज जोडत चल.... वजा वजा गाळत चल...... आपलं म्हणून जपत चल.. परकं तेवढं सोडत चल .... राम इथेच..कृष्ण इथेच.... सर्वगामी शोधत चल.... अपर्णा भागवत एन 88 अनूपनगर इंदूर (म प्र)