जीवनभान
आरस्पानी स्वप्नांच्या शुभ्र महालात मी स्वतःला बंदिस्त केलं...
सार-या हिरव्या वाटा पायतळी घातल्या...
गर्द रात्रीच्या मांडीवर बसून चांदण्यांचे
अवघे गावच आपलेसे केले..
चंद्रही कलंकहीन मला खुणावत राहिला..
सूर्याच्या दिप्तीनंही सुखावलो ...
नी मी तप्तहीन प्रवास सुरू केला....
अवघी स्वःप्नांची नि सुखाची कारंजी
अंगावर घेऊन मी सुखाचा घेतला निरंतर शोध...
मी सुखावलो असंही वाटलं..
त्याच क्षणाला माझ्यातला सिध्दार्थ जागा झाला...
'तू जगलास खरंच ? '
प्रश्नानं उभं राहिलेलं प्रश्नचिन्हांचं आवर्त
'अरे ते सुख नव्हतं ..सुखाचा आभास मात्र!'
'दुःख न पाहिल्यानी जगातील दुःख संपत नसतात....'
मला आत आत गलबलून आलं..
माझ्या अस्तित्वगर्भातून आलेलं जीवनभान घेऊन
मी आता निघालोय नव्या वाटेवर....
जिथं सुखदुःखाच्या धुसर क्षितिजरेषेपर्यंत
मला घेता येतो माझाच शोध....
ठेचाळलेल्या वाटेवरही....
अपर्णा भागवत
एन 88अनूपनगर
इंदूर (म प्र )
Comments
Post a Comment