स्वप्न आपल्या डोळ्यात असली ,
तरी ती पहायची असतात .
मजल दरमजल करत ती ,
साकार करायची असतात .
प्रदेश आपला असतो ,
माणसंही आपलीच असतात ….
पण उधळणाऱ्या घोड्यासारखे ,
स्वप्नांचे खूर परके असतात …
म्हणून जपायचे असते
,स्वप्नांचेही आपलेपण …
नाहीतर स्वप्न सार्थक होऊन सुद्धा ,
स्वतःशीच यायचे परकेपण …….
Comments
Post a Comment