आभाळ मोकळे झाले
मळभ दाटुनि आले नि डोळ्यात साठले
भरून आले आभाळ पापण्यात विसावले
चमकली वीज जशी ती हृदय भेदले
वारा चहु दिशांनी भिरभिरे मन थैमानले..
पाऊस कोसळे धो-धो...मनांगण चिंबले
सैराटल्या स्मृतींनी नदी-नाले तुडूंबले
गडगड ढगात वाजे..हृदयी धडधडले
मनातले कोवळे पक्षी...घरट्यास आसावले ..
कोंदले आकाश दशदिशांनी धरतीस वेढले
पाशांनीआठवणींच्या मज सारखेच बांधले...
कधी आभाळ भरून आले कधी आभाळ मोकळे झाले
प्राणातले संगीत उजळून ...श्वासात भरूनि आले...
अपर्णा भागवत
एन 88 अनूपनगर
इंदूर म प्र

Comments
Post a Comment