जगणं काही उरलंच तर
जगणं काही उरलंच तर राखून ठेव श्वासांसाठी...
संथ जलाशय आटले तरी राखून ठेव डोळ्यांसाठी...
ओसाड रेत,उजाड माळ, वैराण वाळवंटापोटी..
उरलेच काही मृगजळ तर राखून ठेव तृष्णेसाठी....
अशा उन्हात,कोरड्या रानात अनवाणी जायचे तर...
राखून ठेव काही झाडं दुपारच्या सावलीसाठी ...
नातीगोती हरवली,सारी माणसं परागंदा
झाली...
तर राखून ठेव थोडी उब उरातल्या आतड्यांसाठी...
इथल्या जंगलात आपलीच माणसं श्वापदं
झाली तर
राखून ठेव थोडी धार तलवारीला प्रतिकारासाठी.....
रात्र असली वैर-यासारखी तरी राखून ठेव चांदण्यांसाठी...
राखून ठेव थोडं आकाश थकलेल्या गात्रांच्या विसाव्यासाठी...
अपर्णा भागवत
एन88
अनूपनगर
इंदूर (म प्र)

Comments
Post a Comment