मृगजळ


 

मंद मंद समीर

माझ्या कानात काही कुजबुजला...

तुझ्या आठवणींशी खेळत राहिला..

सकाळी पाहिलं

अंगणात केशरी सडा शिंपून 

पारिजात दारी फुलला होता...



ही चंद्रभोगी यामिनी

मनाच्या गवाक्षी उभी राहिली.

चंद्रकळा नेसून  ...

तुझ्या धुंद मोरपिसी स्पर्शाचं आवर्त 

मनात भिरभिरत राहिली

अगणित तारकांनी भरून गेलं

माझ्या मनाचं नभांगण....


तुझ्या रंगगंधाचा केशरी उत्सव 

प्राचीच्या क्षितिजावरून

पाहतांना 

आठवणींचा समुद्र 

ते निरामय केशरी प्रतिबिंब

धारण करणारा तपस्वीच वाटला मला...

त्या निःशब्द गंधित हवेत

मनाची राधिका कृष्णमय झाली रे....


आता हा माथ्यावरचा सूर्य तळपून 

तुझ्या आठवणींचं दहनच

 करायला निघाला

या उजाड माळावर विसंबून .....

तेव्हा समजलं..

हे मनाचं आभाळंच फसवं मृगजळ आहे....

हे मनाचं आभाळच एक फसवं मृगजळ आहे.....


अपर्णा भागवत

एन 88अनूपनगर

इंदूर (म प्र)

Comments

Popular posts from this blog

पायवाट