सिंधुताई
सिंधुताई म्हणजे करुणेचा सागर
आईपणाचा अखंड जागर
मातृहृदयाची चीरवेदना
अंतरी उमलून येणारी चेतना
सिंधुताई म्हणजे सीतेच्या
वाट्याला आलेलं प्राक्तन...
चिंधीच्या रूपानं जगलेलं वास्तव..
अंगभर चिंध्या लेऊनही फुलणारं वैभव..
राजप्रासादालाही लाजवेल
असं भावना संवेदनांचं गाव...
सिंधुताई म्हणजे साफल्याचा समुद्र
कवितेच्या सागरातून वेचलेले
शिंपले ..मोती...नातीगोती...
त्या समुद्राच्या आत्ममंथनातून ...
गवसलेल्या अमृतातून
अमृतमय झालेलं जीवन...
अपर्णा भागवत

Comments
Post a Comment