या वयातही आठवणींना बहर येतो ,खरे आहे ,
वठलेल्या झाडांनाही पालवी फुटते खरे आहे ,
म्हाताऱ्या क्षितिजावरही रोज तांबडं फुटतं खरं आहे,
सायंकाळच्या सुर्यालाही पहाटेची स्वप्न पडतात खरं आहे
ओढ्या-नदी झर्यामधून पाणी वाहतेच आहे ,खरं आहे
ग्रीष्माच्या रणरणत्या उन्हातही माणसाची तहान भागतेहेही खरं आहे
सनातन चंद्रातूनही शीतल चांदणं पाझरत आहे ,हेही खरच आहे
रोज उगवणारा सूर्यही नवा-नवाच वाटतो आहे ….
हे सगळं खरं आहे तर माणूसच का रडतो आहे ?
आपल्याच खोट्या दुखांनी उगीच विव्हळत आहे……
तुटले पंख तरी नवी भरारी मारायची असते ……
पराभूत झालात तरी कात नवीन टाकायची असते ……।
मग रोज सूर्य नवा होतो पहाट हसरी होते ……. .
गोळाबेरीज शून्यं असली तरी जगणे सार्थक होते

Comments
Post a Comment