श्रावणाच्या सरिसारखा
ओथंबून टाकणारा
तुझा सहवास .....
सावळ्या मेघांच्या गर्जनेसारखा
उन्मळून टाकणारा तुझा श्वास …।
प्राणात उचंबळून येणारे निळे गर्द मेघ
पिवळ्या सोनसळी उन्हांसारखा
नि हिरव्या तृणांचा मखमली स्पर्श
नि हिरव्या तृणांकुरासारखा सर्जनोत्सुक हर्ष ………
आत आत कुठे रे साकळते ते घननीळ आकाश
प्राणात माझ्या दाटून येतो निळा -निळा कृष्ण श्वास ….
उघड आता तुझ्या चैतन्याची दारं …।
भरून घेऊ दे मला श्वासात श्रावणी वारं
ओथंबून टाकणारा
तुझा सहवास .....
सावळ्या मेघांच्या गर्जनेसारखा
उन्मळून टाकणारा तुझा श्वास …।
प्राणात उचंबळून येणारे निळे गर्द मेघ
पिवळ्या सोनसळी उन्हांसारखा
नि हिरव्या तृणांचा मखमली स्पर्श
नि हिरव्या तृणांकुरासारखा सर्जनोत्सुक हर्ष ………
आत आत कुठे रे साकळते ते घननीळ आकाश
प्राणात माझ्या दाटून येतो निळा -निळा कृष्ण श्वास ….
उघड आता तुझ्या चैतन्याची दारं …।
भरून घेऊ दे मला श्वासात श्रावणी वारं
Comments
Post a Comment