Sindhutai Sapkal hyanchya jeevanavar- by Aparna

जलधारांच्या वर्षावाने माया ओथांबुनी आली ........त्या सिंधुताई 
तेजाच्या तेजात न्हाउनी मानवता प्रकाशित झाली .........त्या सिंधुताई
वाऱ्याचा संघर्ष होऊनी कष्टाचे डोंगर उपसले ..........त्या सिंधुताई 
पृथ्वीच्या मृदगंधाने माता करुणामयी झाली .............त्या सिंधुताई 
आकाशाच्या अथांग निळाईने उघडे बाळ जगविले............त्या सिंधुताई 
पंचभूतांच्या आरतीनेही तेज  गायिले जाणार नाही ...........त्या सिंधुताई 
श्वासांचे अंतर जगणे नाही, हसणे -रडणे जगणे नाही .......हे सांगते माई
स्वप्न पहावी पंखात भरुनी बळ, मागे पाहणे नाही ........हे सांगते माई 
चालत जाणे  कष्टवित पाय, आईचे काळीज होऊनी पाही ..........हेच सांगते माई

Comments

Popular posts from this blog

पायवाट