charoli by aparna
ओठातले गाणे ओठातच ठेवायचे
ही काही रीत नसते,
प्यायचे विषही असेल तर
मरायचीही बंदी असते ,
उगीच खुळेपण करू नये ,
बघ आकाश निळेच असते.
रस जीवनात घेवून बघ,
.जगण्याची धुंदी वेगळीच असते
अपर्णा भागवत लतिका कळमकर (पूर्वाश्रमी) अमरावती जिल्ह्यातील वरुड जन्मगाव शिक्षण. बी.ए.प्रथम श्रेणी मराठी व इंग्रजीत सुवर्णपदक एम ए.व एम फिल मराठी प्रावीण्यासह .. बी एड (मेरीटसह) नागपूर विद्यापीठ वक्तृत्व,लेखन,वाचन व सांस्कृतिक कार्यक्रमात अभिरुची . एम ए ला नागपूरला शिकत असतांना विदर्भ साहित्य संमेलनात वैदर्भिय कवयित्री या विषयावर लहान वयाची सहभागी...तरुण-भारत नागपूर दैनिकात अनेक ललितबंध व कविता प्रकाशित-. उदगीर मध्ये अयोजित अखिल भारतीय मराठी कवी संमेलन मधे कवी म्हनून सहभागी
Comments
Post a Comment