Posts

marathi charolya

चीत करावं अंधाराला , युद्ध  KARA 

alak ati laghu katha........ paus majha sobati

तो एकटक आभाळाकडे डोळे लावून बसला होता ..... महिन्यापूर्वीही तसाच आस लावून बसला होता सरी कोसळतील नि वाफाळून निघालेलं शेत आत आत भिजेल म्हणून ....पाऊस आला ..पेरणी झाली ...हिरवे तृणांकूर उगवले ..... वाढताहेत पिकं  म्हणून त्यानं समाधानाचा सुस्कारा सोडला ..... नि कूस फाटल्यासारखा पाऊस धो धो कोसळू लागला ..पाहता पाहता हिरव्या पिकांनी मान टाकली ...घरावरचं छप्पर उडालं ..गुरंढोरं  वाहून गेली ...बायका पोरं यांच्या किंकाळ्या .. गर्भवतींची ओली कूस ..म्हाताऱ्याकोताऱ्यांच्या असहाय हाका ....दूधपित्या मुलांचे आक्रोश ...... पाऊस वैरी झाला ......सोयऱ्यानीच वैर धरलं तर कुठं न्याय मागावा ?... आणि जपायला उरलंय तरी काय मागं ..... कोणासाठी जगायचं नि कुणाची आस धरायची?.... उजाड मनानं तो स्वतःशीच झगडत राहिला ..... झोपेनं त्याला कवेत घेतलं ..... गाढ झोप .... निर्वाणीची झोप ..... पावसानं शेवटी आपली जन्माची सोयरीक निभावली ....... त्या रात्री पावसानं नि पुरानं उरलंसुरलं अवघं कवेत घेतलं ....... त्याच्यासकट .....   
या खुळ्या ढगांनी मज केंव्हाच चित्त केले , माझ्या मुक्या दिशांचे देहभान मिटले .... मागेन मी म्हणालो ,माझे आभाळ वेडे ... .बरसून त्यांनी अवेळी  कंगाल मजला केले ......  स्मृतींत माझ्या हिरव्या ..... होती स्वप्ने धुंद बहूल ... .. वादळात थरारुन विझून ..... वाहून देशी दूर नेले ..... पाऊस असतो दिवाणा   .... . हे वेड बाळगून होतो ......    तो नाहीच सखया मित ... . मज आज हे कळून आले ........ 
हे नृत्य शुभंकर व कल्याणकारी असतं . त्या नृत्यात अनेक विभ्रम असतात . भ्रमाचे भयाकार असतात , नि संभ्रमाचे उदास सूरही ....सर्जनाची गर्ज असते नि संहाराचा त्रिनेत्रही असतो विजा कडाडतात तेव्हा घरं नि मनही हादरतात . या शिवनृत्याची अनिवार ओढही वाटते नि हे आपल्याला पेलवणारं नाही हे पण कळतं . आभाळ मळभलं की माणसाला उन्हाची ओढ वाटते ..उन्हं तापतात तेव्हा या मनस्वी पावसाची .... गंमत आहे .... अप्राप्याचं  कायम आकर्षण ...नेहमीच दुरस्थ स्वप्न क्षितिजासारखी साद घालतात . तृप्ती कशी ती नाहीच . हे हवे ,ते नको च्या चक्रात अडकलेलं त्याचं मन कडेकपारीतून धावणाऱ्या उन्मत्त मेघधारांसारखंच अज्ञाताच्या पाठी धावत असतं ....... बालकनीतून दिसणारा  घराच्या अंगणात उभा असलेला  माझा  आवडता बिल्ववृक्ष ......या ऋतूत त्याच्या शाखोपशाखांचा पर्णविस्तार नजरेत भरणारा असतो . हिरव्यागार बिल्वदलांनी समृध्द ..... शिवावर कोणी कितीही दळांची लाखोली वाहिली तरी त्याचं पर्णवैभव डौलात उभं असेल . पावसाच्या पडणाऱ्या कोटीतिर्थानी ती शुभस्नात होतात तेंव्हा या तांडव नृत्यालाही विलक्षण अर्थ येतो . काही पानं ...
श्रावणकिमया अचानक आभाळ गर्द झालं . धुक्याची चादर लपेटल्यागत आभाळानं धूसरपणा पांघरला नि चहूंकडून अंधारून आलं . अशावेळी पूर्वजन्माच्या सावल्या मनावर ठिबकाव्यात तसं मन दाट अंधारून जातं . पण या पाऊसवेणा असतात . तप्त धरित्रीच्या कुशीला शांत करणाऱ्या पावसाला त्यांत निमंत्रण असतं .... अबोल नि मूक निमंत्रण ..... धरेच्या मूक निमंत्रणाचा स्वीकार करून आभाळ वेडं वेडं होतं ....त्याचं मन सुपाएवढं होतं ...झांज ,टिपऱ्या नि ढोलक घेऊन तो स्वागतातूर मेघ धरित्रीला एखाद्या प्रियकराच्या ओढीनं भेटायला निघतो नि ती  एका क्षणात चिंब भिजून जाते .... पाऊस कसा धोधो कोसळू लागतो ...जलतुषार अगदी बारीक पण वेगाने आकाशाच्या चाळणीतून समत्वबुद्धीने ताल नि सूर लयीमध्ये घोंघावत झेपावतात . त्याचा आसमंत व्यापून टाकणाऱ्या ताल ,गती आणि लयीन आदिमकाळापासून आजतागायत चराचर सृष्टीला वेड लावलं आहे . विजेच्या गडगडाटाने पावसाला शिवशंकराच्या प्रलयनृत्याचं प्रतिमान येतं .. प्रवाही मी ,प्रमत्त मी असं म्हणत हे निसर्गाचं शिवतांडव खूप वेळपर्यंत चालू राहिलं तर सुरक्षिततेच्या कायम कवचात लपेटलेल्या माणसाला क्षण दोन क्षण भ...
कालच्या निष्पर्ण झाडांवर , आज नवी पालवी दिसली ...... शिशिराच्या या सर्द हवेत , मधुगंधाची  धुंदी हसली .... हसऱ्या आभाळाला कवेत घेऊन , बगळ्यांची माळ दिसली.......  वासंतिक सृष्टी रंग गंधात , न्हाऊन शृंगारून आली ...... तरी म्हणतोयस अजून वसंत ऋतूचं आगमन झालंच नाही ........   असं नतद्रष्ट व्हायचं नाही ..... ऋतुंशीही  ईमान राहावं .... . आतले ऋतु कोणतेही असू देत सृष्टीचेच होऊन राहावं ........