कालच्या निष्पर्ण झाडांवर ,
आज नवी पालवी दिसली ......
शिशिराच्या या सर्द हवेत ,
मधुगंधाची धुंदी हसली ....
हसऱ्या आभाळाला कवेत घेऊन ,
बगळ्यांची माळ दिसली.......
वासंतिक सृष्टी रंग गंधात ,
न्हाऊन शृंगारून आली ......
तरी म्हणतोयस अजून वसंत ऋतूचं
आगमन झालंच नाही ........
असं नतद्रष्ट व्हायचं नाही .....
ऋतुंशीही ईमान राहावं ....
. आतले ऋतु कोणतेही असू देत
सृष्टीचेच होऊन राहावं ........
आज नवी पालवी दिसली ......
शिशिराच्या या सर्द हवेत ,
मधुगंधाची धुंदी हसली ....
हसऱ्या आभाळाला कवेत घेऊन ,
बगळ्यांची माळ दिसली.......
वासंतिक सृष्टी रंग गंधात ,
न्हाऊन शृंगारून आली ......
तरी म्हणतोयस अजून वसंत ऋतूचं
आगमन झालंच नाही ........
असं नतद्रष्ट व्हायचं नाही .....
ऋतुंशीही ईमान राहावं ....
. आतले ऋतु कोणतेही असू देत
सृष्टीचेच होऊन राहावं ........
Comments
Post a Comment