माझी जन्मांतरीची वेदना



माझी जन्मजन्मांतरीची वेदनाच माझी जन्मांतरीची साधना आहे ,
 आपला अग्नी तू प्रज्वलित होऊ दे ,
माझी दुर्बलता पाहून माझ्यावर कृपा करू नकोस ,
माझ्या वाट्याचं दुःख मी सहन करीन .,
माझ्या वासना भस्मसात होऊ दे .
तुझ्या अमोघ स्वरात  मला बोलाव ना  ..
आता व्यर्थ विलंब करू नकोस ...
माझ्या .छातीवरील सर्व बंधने तुटून जाऊ देत ,
तुझा शंखनाद उच्चं स्वरात होऊ दे ,
माझा सारा प्रसाद नि गर्व नष्ट होऊ दे
,नि तीव्र व प्रखर चेतना जागू दे .
गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर -गीतांजलीतून  ( अनुवाद अपर्णा भागवत)

Comments

Popular posts from this blog

पायवाट