तुझा निर्मळ अमृत निर्झर
तुझा निर्मळ अमृत निर्झर
प्रेम -प्राण ,गंध -गीत ,प्रकाश पुलकित होऊन
अखिल पृथ्वीलोकाला जलमय करत झरत आहे .
आज दाहीदिशांची बंधनं तुटली आहेत .
सर्व दिशांमध्ये आनंद मूर्त होऊन जागला आहे .
माझंही जीवन आनंदरूपी अमृतानं ओतप्रोत झालंय .
सार्थक्याच्या -कल्याणाच्या रस सरोवराच्या स्पर्शाने
माझी जाणीव आनंदित होऊन कमळासारखी उत्फुल्ल झाली आहे ....
त्याचा सारा मधुरस तुझ्या चरणाशी आकंठ वाहू लागला .
निर्बंध उषेची प्रभातीची लालिमा या निरव आकाशात
माझ्या प्राणामध्ये जागली ,
माझ्या आळसावलेल्या डोळ्यांवरची झापड आता दूर झाली आहे .
गुरूदेव रवींद्रनाथ ठाकूर --गीतांजली तून अनुवाद -अपर्णा भागवत

Comments
Post a Comment