दूर कुठे दिवस कसा
झुरत झुरत पाखरावाणी होतो ...
 आभाळभर भिरभिरणारा
जीव आत कासाविस होतो ...

झुंजूमुंजू होतात दिशा
अंधार झिरपत झिरपत येतो ......
कळसावरच्या चिमण्यांच्या  ...
. डोळ्यांमध्ये कातरत जातो ...

पाडसावानी हंबरु लागते
 सारी सृष्टी लेकरूं होते
पान्हा फुटल्यासारखी हलकेच .....
आभाळमाया दाटून येते ......

तारे सारे हसत हसत ,
आकाशाला रिंगण घालतात ...
चंद्रकोरीसोबत गोलगोल
. झिम्मापाणी   खेळू लागतात  ...

क्षणांचाच खेळ सारा,
 आशा नि निराशा ....
सृष्टिच्याच कुशीत हसे.
 कान्हा,तान्हा जीव जसा ......







Comments

Popular posts from this blog

पायवाट