bandist bet
आकाश ओथंबून खाली आलं
नि मला विचारतं झालं
कशाला तुझे डोळे उगाचच पाझरताहेत ?
बघ या काळ्याकभिन्न मेघांनाही
हिरवी स्वप्नं पडत आहेत ......
तृणांकुराच्या चैतन्याची लवथवती धार
त्यांच्याही मुशीतून पाझरते आहे ......
स्वतःशी कधी रुसायचं नसतं
जगणं कधी नाकारायचं नसतं
शेवटी प्रत्येकाच्या आत बघ
एक बंदिस्त बेट असतं ......
खूप किती साठलं दाटलं
तरी पाझरत पाझरत वाहायचं असतं
नि मला विचारतं झालं
कशाला तुझे डोळे उगाचच पाझरताहेत ?
बघ या काळ्याकभिन्न मेघांनाही
हिरवी स्वप्नं पडत आहेत ......
तृणांकुराच्या चैतन्याची लवथवती धार
त्यांच्याही मुशीतून पाझरते आहे ......
स्वतःशी कधी रुसायचं नसतं
जगणं कधी नाकारायचं नसतं
शेवटी प्रत्येकाच्या आत बघ
एक बंदिस्त बेट असतं ......
खूप किती साठलं दाटलं
तरी पाझरत पाझरत वाहायचं असतं
Comments
Post a Comment