दरवाज्यावर थाप पडली कि काळजात
होणारी हुरहूर वय ,काळ परिस्थितीप्रमाणे बदलतेच ना ?
अरे आता आता तू आलास की हरखून जाणाऱ्या
हृदयाची स्पंदनं कशी ,केव्हा आणि कुठे लोपली
काळाच्या प्रवाहात समजलच नाही बघ ......
कुठे आत आत साठवून ठेवता आली असती तर
मधुगंधासारख्या त्या आठवणींच्या स्पर्शानेच
या एकाकी दिवसांना परिसस्पर्श झाला असता ना .......
घरट्यातून पाखरं दूरदेशी उडाली आहेत .....
. खिडकीच्या गजांमधून दिसणारं हे नीरभ्र आभाळही
आपलंच आहे .......
प्रयोजनासाठी व्याकुळलेलं .......
. घेऊ या कवेत ......जगू या क्षणभर ......
स्वतःसाठी ...... स्वान्तसुखाय .......

Comments
Post a Comment