मी जेव्हा दीप प्रज्वलित करतो तेव्हा तेव्हा तो मालवतो .
म्हणून तुला माझ्या या झोपडीत अंधारात
 बसावं लागलं ....
माझ्या जीवन वेलीची मूळ शुष्क झाली आहेत ,
त्यावर कळ्या उमलतात
 पण फ़ुलं उमलत नाहीत .
माझ्या व्यथावेदना हाच नजराणा,
आयुष्य भर केलेली सेवा
फुलांचं वैभव ,पूजेचा महिमा ,
माझ्यापाशी काहीच नाही ....
 तुझा हा पुजारी दिनवाण्या वस्त्रांत बसला आहे ,
त्याच्या  या ऊत्सवात कोणीही  भाग घेतला नाही ,
बांसरी वाजली नाही ,घर सजलं नाही .....
केवळ या मोडक्या झोपडीत रडत रडत मी तुला बोलावून आणलं आहे

(रवींद्रनाथ ठाकूर यांच्या गीतांजली तून ). अनुवादक अपर्णा भागवत 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पायवाट