मी जेव्हा दीप प्रज्वलित करतो तेव्हा तेव्हा तो मालवतो .
म्हणून तुला माझ्या या झोपडीत अंधारात
बसावं लागलं ....
माझ्या जीवन वेलीची मूळ शुष्क झाली आहेत ,
त्यावर कळ्या उमलतात
पण फ़ुलं उमलत नाहीत .
माझ्या व्यथावेदना हाच नजराणा,
आयुष्य भर केलेली सेवा
फुलांचं वैभव ,पूजेचा महिमा ,
माझ्यापाशी काहीच नाही ....
तुझा हा पुजारी दिनवाण्या वस्त्रांत बसला आहे ,
त्याच्या या ऊत्सवात कोणीही भाग घेतला नाही ,
बांसरी वाजली नाही ,घर सजलं नाही .....
केवळ या मोडक्या झोपडीत रडत रडत मी तुला बोलावून आणलं आहे
(रवींद्रनाथ ठाकूर यांच्या गीतांजली तून ). अनुवादक अपर्णा भागवत

Waah yaar aai. Kiti masttt
ReplyDelete